रोहित वेमुला या विद्याथ्र्यांने विद्यापीठ प्रशासणाला कंटाळून आत्महत्या केली

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक, सामाजीक हितासाठी लढण्यास नेहमी तत्पर असते. हैद्राबाद केंद्रिय विद्यापीठ येथे रोहित वेमुला या विद्याथ्र्यांने विद्यापीठ प्रशासणाला कंटाळून आत्महत्या केली. त्या विद्याथ्र्याला न्याय मिळावे व जबाबदार व्याक्तींना शिक्षा व्हावी व असा प्रसंग कोणत्याही विद्याथ्र्यांवर येऊ नये म्हणुन भारतातील सर्व विद्यापीठात एस. सी., एस.टी. विद्यार्थी स्वतं़त्र सेल निर्मान करावा या करिता संघटनेच्या वतीने महात्मा फुले शैक्षणिक परिसर (कॅम्पस) व डाॅ. व्ही. बी. कोलते मेन लायब्रेरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे निदर्सने करण्यात आले.