डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना स्नेहमीलनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि.२३ सप्टेंबर २०१७

Loading Map....

Date/Time
Date(s) - 23/09/2017
All Day

Location
GURUNANAK HALL

Category(ies)


डॉ.  बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना स्नेहमीलनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात महान मानवतावादी क्रांती देशात आणून संविधानिक लोकतांत्रिक आणि प्रबुद्ध भारताची निर्मिती केली . हाच वारसा पुढे घेऊन स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मानवी मूल्यांवर नवसमाजाची निर्मिती करणे या ध्येयासाठी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेची निर्मिती झाली . विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन  त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्भयता आणि मानवता  निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संघटना १९८१ पासून सातत्याने करीत आहे . विद्यार्थी जीवनाचा काळ हा सृजनतेचा सोहळा  असला तरी , तरुणाईला आकार देऊन सृष्टीचे सौंदर्य त्यांच्या पुढ्यात उभे करता येते . त्याचवेळी हा तरुण अंधाराचा नव्हे तर उजेडाचा पुरस्कार करते .  एकविसाव्या शतकामध्ये आंबेडकरी आंदोलन हा संपूर्ण शोषितांच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे . हा जाहीरनामा आपल्या हातात ध्वजासारखा घेऊन कणखरपणे रणांगणावर उभे राहण्याची वेळ आलेली आहे . 

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की , “It is better to die at a young age for a great cause than live like an old oak for nothing “. खूप काळापर्यंत काहीही न करता जगण्यापेक्षा एखाद्या महान ध्येयासाठी  तरुणयातच आपला प्राण अर्पण करणे केव्हाही श्रेष्ठ असते .  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांवर विश्वास ठेवून आंबेडकरी तरुणांनी आपल्या मुठींमध्ये ‘इन्कलाब’ जागृत ठेवला पाहिजे . गुलामीचे बंध तोडून मानवी हक्कांसाठी आणि न्यायासाठी युवकांनी झटले पाहिजे आणि आदर्श नवक्रांतिकारी विचारांचा पुरस्कार करून नवसमाजाची निर्मिती आणि प्रबुद्ध भारताच्या दिशेने मार्गक्रम करीत राहिले पाहिजे . या उदात्त हेतुला उराशी बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना सातत्याने कार्यरत आहे . त्याचाच एक भाग म्हणून प्रबोधन आणि स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत .
 
 

[socialring]

2 Replies to “डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना स्नेहमीलनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि.२३ सप्टेंबर २०१७”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*