विद्यार्थी संघटना: परिवर्तन जन्माला घालणारे क्षितिज

                              विद्यार्थी संघटना: परिवर्तन जन्माला घालणारे क्षितिज

         student-organisation                                                            डाॅ. अनमोल शेंडे,

आंबेडकरी विचारवंत.

9404120409

वि़द्या प्राप्त करणे हे ज्याचे ध्येय असते तो विद्यार्थी ! विद्या मिळविण्यासाठी ज्याची सतत धडपड सुरू असते तो विद्यार्थी! विद्या मिळविणे हा ज्याच्या जगण्याची स्थायी भाव झाला आहे तो विद्यार्थी विद्या मिळविणे म्हणजे ज्ञान मिळविणे. हे ज्ञान जसे पुस्तकातून प्राप्त करायचे असते तसे ते जीवनाच्या पाठ्यपुस्तकातूनही मिळवायचे असते. जीवनात उगवलेल्या नानाविध घटना प्रसंगातून सतत ज्ञानाची वृद्धी़ विकसन होत असते.

                                              विद्यार्थी हे सतत उज्वलतेकडे नेणाऱ्या धडपडीचे नाव आहे. विद्यार्थी हे जीवनाच्या पूर्णांकाकडे आणि आदर्शाकडे झेपावणाऱ्या आदर्शाचे नाव आहे. विद्यार्थी हे संस्कृती निर्माणाच्या कार्यक्रमाचे नाव आहे. सर्व कल्याणकारी तत्वज्ञान जन्माला घालणाऱ्या प्रवृत्तीचे नाव आहे विद्यार्थी म्हणजे नवनवोन्मेशशालीनी प्रज्ञा केवळ एका वर्गातून दूसऱ्या वर्गात जाने म्हणजे प्रज्ञाकारी विद्यार्थी होणे नव्हे किंवा परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याला अंतिम ध्येय मानने म्हणजे विद्यार्थी होणे नव्हे; तर शिक्षण घेत असतांना निर्माण होणाऱ्या प्रश्नाशी, जटिलतेशी आणि विविध अव्हानाशी विद्याथ्र्यांना नाते जोडता आले पाहिजे. विद्यार्थी जिवनाला उन्नत करण्यासाठी काही नव्यांचा शोध घेत राहण्याची मानसिकताच विद्यार्थी मनाला अधिक प्रगल्भ करित अससे.
विद्यार्थी आणि संघटन या तशा परस्पर पुरक बाबी आहेत. त्यामुळेच विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना हे दोन घटक आपल्याला वेगळे करता येत नाही. हातात हात घलून सोबतीने प्रवास करणारे हे दोन्ही घटक म्हणूनच महत्वाचे मानले पाहिजे. नविन ज्ञान आर्जित करणे हे जसे विद्यार्थी म्हणून आपले कर्तव्य असते तसेच शिकण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या प्रश्नांना टक्कर देणे हे विद्यार्थी संघनेचे कार्य असते. शिक्षण घेत असतांना काही प्रश्नाचे स्वरूप इतके भयंकर नि अक्राळविक्राळ असते की, केवळ वैयक्तिकरित्या या प्रश्नाची सोडवणूक करणे अश्क्य होऊन जाते. अशा वेळेला संघटनेचे बळ वापरूनच त्या त्या प्रश्नांची उकल करावी लागते. एखाद्या मोंठ्या संघटनेला पूर्णत्व देण्याचे काम संघटनाच करू शकते. विद्याथ्र्याला उपकारक अशा घटना अस्तित्वात आणण्याचे सामर्थ केवळ संघटनेतच असते. नुसता एक दगड नाही तर प्रश्नांचा डोंगरच तळहातावर उचलण्याचे धाडस संघटनेच्या पोलादी मनगटात असते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांचे महत्व अनन्य साधारण मानावे लागते.

विद्याथ्र्यांचंे हित जोपासने हा विद्यार्थी संघटनेचा अंजेंडा असतो. आणि तसा तो असला ही पाहीजे. शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या आणि होऊ पाहणाऱ्या सिमस्यांना हद्दपार करणे हे विद्यार्थी संघटनांचे प्रमुख उद्दिष्ठ असते. महापुरुषांची विद्रोही परंपरा जागविणे आणि अंतर्विरोधग्रस्त वर्तमानाची वाट स्वच्छ करणे याला विद्यार्थी संघटना अधिक महत्व देत असते. समस्यांप्रती सावध करणे हे विद्यार्थी संघटनांचे काम असत नाही तर विद्यार्थी इहवादी कसा होईल, नैतिक कसा होईल, समाजात अधिक जबाबदार कसा होईल याचीही काळजी विद्यार्थी संघटनांना डोळयात तेल घालून घ्यावी लागते. विद्यार्थी शहाणा व्हावा, समस्याची जान त्याला चटकन व्हावी, अज्ञान, लाचारी, अंधश्रöा त्याने मनात वागवू नये. केशवसुतांचा तो ’ शुर शिपाई’ व्हावा. असा अनेक बाबीिंचा संग्रह विद्याथ्र्यांच्या मनात जागविण्याचे काम विद्यार्थी संघटनांना करावे लागते. सामाजीक परिस्थितीचे अचूक आकलन विद्याथ्र्यांनमध्ये व्हावे आणि कुठल्याही परिस्थितीत विद्याथ्र्यांच्या मनाचा कणा ताट राहावा यासाठी विद्यार्थी संघटनांना झटावे लागते. संकटावर स्वार होऊन मानूसकीची गौरवगाथा शिल्पित करणे हा विद्यार्थी संघटनेंचा हा निर्मळ हेतू असतो. परंपरेची ओझी उरात न वागवता समाजवादी, धर्मनिरपेक्ष विद्यार्थी तयार करणे हे विद्यार्थी संघटनाचे कार्य असते.
शिक्षण क्षेत्राला सकारात्मक पध्दतीने बदलविण्याची प्रचंड ताकद नि उर्जा विद्यार्थी संघटनेत असते. प्रश्न असा असतो की, विद्यार्थी हिताला समोर ठेवित प्रामाणीकपणा अभंग राखून किती अस्थेने विद्यार्थी संघटना राववितात. त्याची आजमितीला अनेक विद्यार्थीै संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत परंतू खऱ्या अर्थाने विद्याथ्र्यांकरिता झटणाऱ्या विद्यार्थी संघटना अल्पमतात आलेल्या आहेत. ज्याला ‘विद्यार्थी संघटना’ म्हणावे अशा संघटनांचा दुष्काळच आहे. दोन-चार संघटना वजा केल्या तर बाकीच्या संघटनांना ‘विद्यार्थी संघटना’ मनावे का? हाच खरा प्रश्न आहे. राजकीय पक्षाला बळकट करण्यात काही संघटना धन्यता मानतात; तर काही संघटना धर्मांधता वाढविण्यातच मर्दुमकी समजतात. काही संघटनंाना कुठलेच वैचारिक धोरण नसते. केवळ असण्यासाठीच काही विद्यार्थी संघटना स्थापन झालेल्या आहेत. अशा विचित्र परिस्थितीत स्वतःचा स्वतंत्र चेहरा बाळगणाऱ्या दोन चार विद्यार्थी संघटनांची जबाबदारी शतप्टीने वाढते. त्यातल्यात्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव धारण करणाऱ्या विद्यार्थी संघटनेने किती दक्ष, प्रखर नि कीती जबाबदेही असले पाहिजे याची प्रस्तूत अवस्थेवरून साक्ष पडते.

                                               एकापेक्षा जास्त विद्यार्थी कुटल्या तरी हेतूने जेव्हा एकत्रीत येतात तेव्हा त्याला संघटनेचे स्वरूप प्राप्त होते. परंतू संघटना म्हणजे काही गर्दी नव्हे. तिथे दर्दी विद्याथ्र्यांचा भरणा नसेल आणि विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन विचााररूपाने विद्यार्थी एकत्र येत नसतील तर अशा विद्यार्थी संघटनेला कुठलाही अर्थ नसतो. त्यामुळे विद्यार्थी संघटनेला तात्वीक विचार अधिष्ठान लाभले असले पाहिजे. बाबासाहेबांचे तत्वज्ञान माननाऱ्या आणि जोपासणाऱ्या विद्यार्थी संघटनेला सेक्युलर विचाराची बैठक असेल तरच संघटन दिर्घ पल्ला गाठू शकेल बाबासाहेबांच्या स्वप्नातील विद्यार्थी साकारू पाहणाऱ्या विद्यार्थी संघटनेने हे लक्षात ठेवले पाहिजे की, संघटनेत सामिल होऊ पाहणारा विद्यार्थी हा बाबासाहेबांचे तत्वज्ञान माहीत असणारा समस्येप्रती सलग असणारा समस्येवार चाल करून जाणारा बहूलक्षी असला पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय हे त्याला समजले पाहिजे. आखलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी काय करावयास हवे याचे नियोजन कौषल्य त्याच्यात असले पाहिजे. प्रस्थापीतांचे कुटील डाव ओळखण्याची त्याच्यात अचूक क्षमता असली पाहिजे असे अभ्यासपूर्ण स्वयंपूर्ण विद्यार्थी ज्या संघटनेत असतात, ते संघटनेत अधिक धारदार, अधिक प्रबळ, अधिक टिकावू असते. विद्यार्थी हे क्रांतीचे नाव आहे. जो माणूसकीचा सखा आणि विद्रोहाचा सांगाती आहे. विद्यार्थी हा गतीत्व धारण करणारा जीवनाचा रखवालदार आहे. प्रचंड विद्रोहाचे आणि उर्जेचे पर्व जन्माला घालण्याची त्याच्यात प्रचंड क्षमता आहे. विद्यार्थी हे परिवर्तनाच्या चळवळीचे विराट रूप आहे. हक्क, अस्मिता नि अधिकारासाठी भांडणारे ते महाअंादोलन आहे. विद्यार्थी म्हणजे क्रांती जन्माला घालणारी पहाट, विद्यार्थी म्हणजे मानूसकीच्या संस्कृतीची अभेद्य अशी निर्मिती जगात आजवर ज्या काही क्रांत्या झाल्यात त्या विद्यार्थी युवकांनी जन्माला घातल्यात. विद्यार्थी युवकच समाजाला डोळस आणन्याची हिम्मत ठेवतात. समाजाचा शहानपणा वृंध्दीगत करण्यात विद्यार्थी युवक फार मोठी भूमिका पार पाडू शकतो. विद्यार्थी म्हणजे नवनिर्मितीचे बियाणे. समाज हा विद्यार्थी युवकांच्या मुखाने बोलत असतो या दृष्टीने संघटनेच्या आणि समाजाच्या दृष्टीनेही विद्याथ्र्यांचे मोल मोठे असते.

                                        ज्या विद्याथ्र्यात युग वाकविण्याची ताकद आहे अशा विद्याथ्र्यात अधिक पोलादीपणा विद्यार्थी संघटनेने भरला पाहिजे पण ज्या विद्याथ्र्यांच्या सवयी प्राथमिक स्थरावरच तरंगत आहेत अशांची ही अभिरूची अधिक चैकस, तेजस्वी करण्याचे काम विद्यार्थी संघटनेने केले पाहिजे. जयंत्या पुण्यतिथ्या पुरते संघटनेने मर्यादित करून घेऊ नये तर, वर्तमानातल्या ज्वलंत विषयाचा कृतीकार्यक्रम संघटनेने झाले पाहिजे. ज्या आयुष्याच्या रणसंग्रामात आपण उडी घेतली त्या रणसंग्रामातील प्रष्नाचा वेध लक्षात घेऊन उत्तरे षोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठस्तरावर आणि षासनस्तरावर आज विविध प्रष्न निर्माण झालेले आहेत. एकिकडे परिक्षा न घेता विद्याथ्र्यांना अडाणी बनबवण्यचाचे षडयंत्र सुरू आहेत, तर दुसरीकडे शिक्षण महाग करून शिक्षणाबद्दलची अनास्था बाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकिकडे तोच तो अभ्यासक्रम राबवून विद्याथ्र्यांमधील परिवर्तनवादी विचार प्रक्रियेला ब्रेक लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे योग्यता असूनही नौकरी विकूण विद्याथ्र्यांमध्ये नैराष्य निर्माण करण्याचे मनसूबे रचल्या जात आहेत. अशा संभ्रमीत करणाऱ्या वातावरणात विद्यार्थी संघटनेने अधिक तेजस्वी, अधिक आक्रमक होण्याची कधि नव्हे येवढी गरज निर्माण झाली आहे. काही खराब लोंकाच्या हाती शिक्षण गेले असून, ज्यांना शिक्षणाचे पावित्र्य माहित नाही असे लोक शिक्षण महर्षि, शिक्षण सम्राट झाले आहेत. ज्यांना शिकायचे आहेत, सुसंस्कृत व्हायचे आहेत अशांचे रस्ते मात्र नानाविध कारणे दाखवत आडवित जात आहेत.

                              शिक्षणाचे बाजारीकरण आणि जागतीकीकरण फार झपाटयाने सूरू आहे. विद्यापीठस्तारावर आणि शासनस्तरावरील महत्वाची शैक्षणिक पदे ओळखी पाळखीने भरण्याची नविन परंपरा सूरू झाली आहे. कुलगुरू आता शैक्षणिक पात्रतेची पोस्ट न राहता राजकीय पोस्ट झाली आहे. खऱ्या अर्थाने उच्च विद्या विभूषीत पण कलदार माणसे ओळखी पाळखी अभावी मागे राहत आहेत. हूषार विद्याथ्र्यांचे खच्चीकरण केल्या जात आहे शिक्षणामूळे विद्यार्थी षहाणा होण्याऐवजी स्वकेंद्री होत आहे. शिक्षणामुळे समाज परिवर्तन होत आसे बोलल्या जायचे पण अलिकडे हि अंधश्रद्धा ठरते की, काय अशी थरकाप उडविणारी नविन परिस्थिती उदयाला येण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.
“Men are born ignorant, not stuffed; they are made stuffed by education” असे बड्रोट रसेल म्हणाला होता, सध्याच्या रक्तबंबाळ वर्तमानात रसलचे हे म्हणने अधिक खरे ठरण्याचे संकेत दिसू लागले आहेत. विद्यार्थी भयग्रस्थ होईल, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र आखल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थी चळवळीपासून अलिप्त होऊ पाहते आहे. ठरविलेले स्वप्न पुर्ण करण्याऐवजी थेडक्यात समाधान माणन्याची विचित्र प्रवृत्ती विद्याथ्र्यांमध्ये फार झपाट्याने वाढते आहे. अशा भयकंप परिस्थितीत विद्यार्थी संघटना कोणती भूमिका घेते यावरच पूढची परिस्थिती अवलंबून राहणार आहे.

                                              विद्यार्थी संघटना हे नव्या षक्यता जन्माला घालणारे वादळ आहे. विद्यार्थी संघटना हे परिवर्तनाच्या कक्षा रूंदावनारे महाकाय क्षितीज आहे. तेजःपुंज विचारांची ती महाशक्ती आहे. तिने ठरवले तर नव्या युगाला, नव्या विद्याथ्र्याला, नव्या शिक्षणप्रक्रियेला ती जन्माला घालू षकते. लोकषाही, संविधान आणि इतरही सामाजिक क्षेत्राचा ऱ्हास करण्याची पद्धतशीर प्रयत्न सुरू झालेले असतांना विद्यार्थी चळवळीने अधिक वेगवाण होण्याचा संदेषच हा विचित्र काळ देतो आहे. विद्याथ्र्या-विद्याथ्र्यांमध्ये जातीभेदाचे विष पेरून त्याच्यात झगडे निर्माण करण्याचे, गटातटात विभागणी करण्याचे जहरी प्रयत्नही जोरात सुरू आहेत. मनाला निराषा आणणाऱ्या अषा परिस्थितीत प्रज्ञा, शिल आणि करूणेचा संगम मनात जागवित विद्यार्थी संघटनेने आता सुसज्ज होण्याची वेळ आहे. विद्यार्थी जेव्हा जागा होतो आणि प्रस्थापितांच्या वाड्यांना जेव्हा हादरे बसायला लागतात तेव्हा विद्याथ्र्यांचे मनोबल खच्चीकरण कसे करता येईल याची आखणी केल्या जाते. अशावेळी संघटनेने विद्याथ्र्यांच्या मनामध्ये बळ पेरले पाहिजे. उज्जवलतेकडे, परिवर्तनाकडे झेप घेण्याची तळफड झाले पाहिजे अंधार दुर करणारे दिवे त्यांच्यात पेटले पाहिजे. स्वार्थ, अहंकार, दंभ, मोहमाया, भष्टाचार आदिंना जमीनदोस्त करून विद्याथ्र्यांना अधिक जबाबदार केले पाहिजे. अजूबाजूचे रंजन विद्याथ्र्यांना गिळंकृत करते की, काय अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच चहूबाजूंनी विविध समस्यांनी विद्याथ्यांची नाकेबंदी केली आहे. अशा अनिष्ट वातावरणात विद्यार्थी संघटनानी ज्वलंत होण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या क्रांतीकारी व्यक्तीमत्वाला जगण्याचे कृतीशील आषय बनविले तर कुठल्याही विद्यार्थी संघटनेला समस्येसोबत लढण्याचे आणि प्रवाहासोबत धावण्याचे आपोआप निर्भय बळ मिळेल वेगाने बदलणाऱ्या पर्यावरणात त्यांची तर विषेषच आवष्यकता आहे. काळाचा सांगावाही तोच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*