Campus protest

campus-protest

विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत घटक आहे. हे लक्षात घेता, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती विद्यापीठाने केंद्रभूत असणे खूप महत्त्वाचे असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास वाव मिळतो. विद्यापीठ जेव्हा “विद्यार्थी केंद्रभूत विद्यापीठ” या तत्त्वाचा स्वीकार करेल, त्यावेळेस विद्यार्थी पूरक अशा शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. परंतु आज असे न होता, नागपूर विद्यापीठ मात्र याच्या विपरीत कार्य करतांना दिसत आहे. मागील काही वर्षात विद्यापीठ ज्या प्रकारे विद्यार्थी कल्याण बाधक धोरणांचा अवलंब करीत आहे, त्याचा विद्यार्थी जीवनावर आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.

ज्यामध्ये आचार्य पदवी (Ph.D.) प्रवेश/ नोंदणी/ रिटेन्शन (retention fee)वार्षिक संशोधन केंद्र (Annual research centre fee)आणि शोध प्रबंध जमा शुल्कात (Thesis submission fee) करण्यात आलेली अवाढव्य वाढ, बहिशाल अभ्यासक्रम (External courses) बंद करणे, परीक्षांचे निकाल नियोजित वेळेत घोषित न करणे, नागपूर विद्यापीठात दुसऱ्यांदा पदव्युत्तर पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश निर्बंध, विद्यापीठाच्या सर्व ग्रंथालयात विद्यार्थ्यांना खुल्या प्रवेशास (Open access) (स्वतः पुस्तक निवडीची) मुभा नसणे, कमवा आणि शिका योजनेतील मानधन आणि जागा कमी करणे, व्यायामशाळेच्या (Gym) शुल्कात वाढ करणे, विद्यापीठातील सर्व विभाग आणि ग्रंथालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नियमित नसणे, अशा विविध समस्यांना विद्यार्थ्यांना सामोर जावे लागत आहे.

या सर्व समस्या विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेद्वारे महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर 19 सप्टेंबर 2022 ला निदर्शने करण्यात आले आणि विद्यापीठ प्रशसना कडून मागण्या मान्य करून घेतल्या

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*