Another World is Possible – Reconstruction of the World

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सुंदर वाक्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. “It is better to die, at a young age for a great cause, than live like an old oak for nothing.” खूप काळपर्यंत काहीही न करता जगण्यापेक्षा एखाद्या महान ध्येयासाठी तारूण्यातच आपला प्राण अर्पण करणे केव्हाही श्रेष्ठ असते. तारूण्य हे सुंदर असतं. तारूण्यातच सुंदरत्वाची स्वप्ने पडत असतात. तारूण्य हा जीवनाचा असा मौसम असतो की, ज्यात सगळेच ऋतू बहरून आलेले असतात. तारूण्य हळवं असतं. जगण्यासाठी स्वप्नांना उधळत राहण्याचा उन्मत्तपणा याच ऋतूमध्ये प्राप्त होतो. आयुष्याला दिशांचे पंख फुटत असतात. पण तारूण्य हे काचेवरील जलबिंदूसारखंही असतं. एकदा ते घरंगळून खाली ओघळलं की, परत बोटांच्या चिमटीत पकडणं कठीण असतं. मराठी साहित्य, कथा, कादंबÚया, कविता, चित्रपट, गीतं, गझल, कव्वाली यासारख्या माध्यमातून या तारूण्यातल्या मनोवृŸाीचं प्रतिबिंब आपल्यासमोर मांडलं आहे. ही तारूण्याची एक रंगछटा झाली. दुसरीकडे तारूण्याची छटा आपल्याला दिसते. ध्येयासाठी समर्पण, महान कार्यासाठी स्वतःला अग्निकुंडात झोकून देण्याची अदम्य लालसा माफीसाठी विनंती अर्ज लिहिला तर आपली फाशीची सजा रद्द होऊ शकते, हे ठाऊक असतानाही आपलं क्रांतिकार्य जगापुुढे यावं म्हणून फाशीच्या तख्तापर्यंत ‘मेरा रंग दे बसंती चोला’ म्हणत हसत हसत मरणाचं चुंबन घेणारा शहीदे आझम भगतसिंग आपल्याला दिसतो. रोहिणीच्या पाण्यासाठी युद्ध होऊ नये, आपसात रक्तपात घडू नये, वैर वाढू नये म्हणून युद्धनिर्णयाच्या विरोधात प्रखरपणे उभा राहिलेला युवा सिद्धार्थ आणि नियमभंगाच्या दंडासाठी गृहत्याग करून, आपली लाडकी पत्नी यषोधरा व गोड गोंडस बाळ राहुलला सोडून जाताना एका महान स्वप्नासाठी वैभवाचा त्याग करणारा सिद्धार्थ गौतम आपल्याला दिसतो. अदम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड स्वयंविष्वास घेऊन तक्षशिला व विदिशाचे बंड मोडून शांतता प्रस्थापित करणारा युवा अशोक आपल्या ऐतिहासिक जाणिवेवर उभा असलेला आपल्याला दिसतो.

दुसरीकडे एक वर्तमानातील भयाण वास्तव आपल्यापुढे वेडवाकडं नाचतांना दिसतं. अवास्तव स्वप्नांच्या आहारी जाऊन अस्तित्व हरवलेला आजचा नवयुवक, पानठेल्यांवर पान खाऊन अचकट विचकट अंगविक्षेप करीत आधुनिकतेच्या अत्यंत आहारी जाऊन भडक-बेधडक जीवनाचं प्रतिबिंब दाखविणारा बेफाम युवक, दुसरीकडे अंग चोरून खिशात हात घालून समाजात चाललेल्या या बदलाकडे दुरूनच पाहणारी मध्यमवर्गीय युवा मंडळी, कार्गो किंवा रस्ता रूंदीकरणात जमिनी गेल्यामूळे मोबदल्यात मिळालेल्या अमाप पैशांची अंदाधुंद उधळपट्टी करणारा बेजबाबदार युवक, 15 आॅगस्ट किंवा 26 जानेवारीला बिअर पिण्याची स्पर्धा आयोजित करणारी मस्तवाल युवापिढी… आणि एकीकडे प्रचंड अभावात जगणारा आंबेडकरी युवक, कधी बेकारीच्या समस्येने गांजलेला, कुटूंबाच्या व्यापातून, दारिद्र्याच्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढतांना रक्त ओकणारा, गाल बसलेला, पोटासाठी वणवण करणारा, चाय कॅन्टीन, पानठेले, ढक्कलगाडी, रिक्षा ओढताना आतड्याची तार तुटेपर्यंत परिश्रम करणारा हा गरीब युवक… असं हे चित्र आपल्याला आंदणात मिळालं आहे. मग अषा अवस्थेत कुठल्याही राजकीय पक्षासाठी कच्च्या मालासारखा उपलब्ध होणारा हा युवक आपल्याच जिंदगीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभा असलेला आपल्याला दिसतो. कधी मोर्चात, कधी राजकारणात हुकमी एक्का म्हणून, कधी निवडणुकीत दारूच्या पेट्या पोचवताना, कधी जातीय दंगलीत माणसांची डोकी फोडतांना, अनैतिक नेत्यांच्या जयजयकारासाठी घसा फाडताना, कधी सट्टा, मटकापट्टी फाडतांना हा युवक आपल्या तारूण्याचा महत्वाचा काळ उध्वस्त करतांना दिसतो.

अशा या सडलेल्या, कुजलेल्या वर्तमानात आपण जगत आहोत. बेकारीने प्रदान केलेल्या या सामाजिक, राजकीय दुर्गंधित लोळत आपण जगत आहोत. हिंदुत्वाच्या नावावर अंधश्रद्धांचा नरक आपल्या मस्तकावर थापणाÚया टी.व्ही. चॅनल्सच्या जगात आपण मरत आहोत. नागड्या संत-पंतांच्या उत्सवावर करोडो रूपये खर्चणाÚया या शासनव्यवस्थेत आपण जगत आहोत. आणि आपण या देषाचे सन्मान्य युवक आहोत. सगळीकडे ‘खाओ, पिओ, मजा करो’ चा रंगीत माहोल असतांना आपण आंबेडकरी आंदोलनाचं माॅडेल उभरण्याचं भाबडे स्वप्न पाहत आहोत. या अषा वास्तवाच्या पाष्र्वभूमीवर आपण आंबेडकरी विद्यार्थी ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरंच आपण या वास्तवाला बदलवू शकू का? आंबेडकरी आंदोलन हे युवकांच्या प्रष्नांना आणि समस्यांना स्वर देऊ शकेल का? असे अनेक प्रष्न आपल्या मनात निर्माण होत आहेत. खरंच आंबेडकरी युवकांत इतकी शक्ती आहे का? की ते सर्व बकाल वास्तव बदलवू शकेल?

तारूण्य हे तलवारीच्या धारेसारखं असतं. त्याची तेजस्वीता मन आणि मनगटाच्या कर्तृत्वावर घासून ठरविता येते. जगाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर युवकांच्या कर्तृत्वाची एक लांबच लांब ओळ आपल्याला दिसते. दलित पॅंथरच्या काळातला युवकांचा उद्रेक आंबेडकरी आंदोलनाने अनुभवला. पॅंथरच्या धगधगत्या आगीने केवळ रिपब्लीकनच नाही तर प्रस्थापित नेतृत्वालाही प्रचंड हादरे दिले होते. युवाषक्ती ही नेहमीच वर्तमानाला हादरे देणारी ठरली आहे. म्हणूनच धूर्त राजकारणी या युवा शक्तीचा आपल्या राजकारणासाठी वापर करीत आले आहेत. पैसा, पद, प्रसिद्धीच्या लालसेतून युवकांचं अधःपतन घडविलं जातं. राजकारणावर अंकुष ठेवण्याची ताकद युवकांमध्ये असते. उदाŸा नैतिक मूल्ये असलेल्या युवकात मोठमोठ्यांना वाकवण्याची ताकद असते म्हणून अषा युवकांचे विविध पद्धतीने अधःपतन करून राजकारणी लोक त्याचे खच्चीकरण करीत असतात. असा नैतिकदृष्ट्या अधःपतित झालेला युवक मग कुठल्याच कामाचा उरत नाही.     अषाप्रकारे धूर्त राजकारणी एका दगडात दोन पक्षी मारत असतात. आज जर या भ्रष्ट आणि अनैतिक राजकारण्यांच्या छत्रछायेतून राजकीय आणि सामजिक पर्यावरण प्रदूषणमुक्त करायचे असेल तर युवकांच्या मनोभूमीची योग्य पद्धतीने मषागत होणे गरजेचे आहे. माझा हा विचार अधिक आदर्षवादी वाटण्याची शक्यता आहे. पण जीवनमूल्ये आणि व्यवहार यांची सांगड घातल्याखेरीज आपल्या जगण्याला काहीही अर्थ उरणार नाही हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. ज्याच्या खंाद्यावर समाज आणि राष्ट्राची धुरा आहे, तो युवक सुसंघटित होणे गरजेचे आहे. त्याला आपल्या अधिकाराची जाण आली पाहिजे. अधिकार म्हणजे केवळ षिक्षण, नोकरी आणि लग्न आणि भौतिक सुखाची साधने प्राप्त करणे इतकाच याचा अर्थ नाही. लोकषाहीत जगत असतांना माणूस म्हणून आपली काही जबाबदारी आहे, या जबाबदारीचे वहन करीत देष आणि समाजहितासाठी कृतिरत राहणे असा त्याचा अर्थ आहे. भारतीय समाजात युवकांच्या डोळ्यापुढे केवळ शेती वाहून प्रजोत्पादन करणाÚया सांडाइतकं मर्यादित जीवनध्येय उभं करण्यात आलं आहे. येथील सामाजिक रूढी, परंपरांनी युवकांच्या मेंदूचं शेणखत बणवलं आहे. जात, धर्म, पंथाचं विष त्यांच्या मेंदूत भिणवलं आहे. म्हणून कुठल्या उदात्त ध्येयासाठी समर्पित होण्याची स्वप्ने आता त्याच्या मेंदूतून उगवत नाही. क्रांतीसाठी लागणारी उदात्त प्रेरणा आता त्याच्या मेंदूतून जन्म घेत नाही. माध्यमे आणि सभोवतीच्या वास्तवाने त्याच्या आतल्या सामाजिकत्वाची हत्या घडवून आणली आहे. भांडवलषाही, भ्रष्ठ शासनयंत्रणा  आणि अनैतिकतेचा माहौल यांनी त्याच्या आतला सकारात्मक विचार मारून टाकला आहे. झटपट श्रीमंती आणि प्रतिष्ठेच्या हव्यासापायी परिश्रम आणि कर्तृत्वातून जीवन फुलविण्यापेक्षा सहज यष साध्य करण्यासाठी अनैतिक तडजोडी करण्याची स्पर्धा त्याच्या आत विकसित झाली आहे. सभोवतीच्या भडक, उत्तान पर्यावरणाने त्याचा मेंदू फ्रीज करून टाकल्यामूळे मानवी संवेदनांचा दुष्काळ पडला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या संकल्पनांनी युवकांच्या मेंदूवर गारूड केलं आहे. भांडवलषाहीने आपला मेंदू पूर्ण नियंत्रित केला आहे. आपला मेंदू आता आपला राहिलेला नाही. तो कुणाच्यातरी हातातील कळसूत्री बाहुली बनला आहे. त्याचा रिमोट ब्राम्होभंाडवली अर्थव्यवस्थेच्या हातात गेल्यामूळे युवकांना ते आपल्या इषाÚयावर नाचवित आहेत. रक्तपात, खून, जातीय दंगे, घातपात आता या रिमोटवर चालतांना आपण रोज बघत आहोत. खरंच आपण यातून मुक्त होणार आहोत का? आंबेडकरी विचारात या नवभांडवली विळख्यातून आपणांस मुक्त करण्याचे सूत्र आहे का? असा एक मार्मिक प्रष्न आपल्यापुढे आहे. आणि या प्रष्नाची उकल करणे आज गरजेचे आहे. कारण देषात सभोवती सुरू असलेल्या या विषाक्त वातावरणाचे बरेवाईट परिणाम आंबेडकरी समाजातील युवकांवरही पडलेले दिसत आहे. भीमजयंतीत डिजेवर वेडेवाकडे नाचणाÚया आपल्याही युवक-युवती पाहिल्या की, प्रस्थापितांनी आपलेही कसे माकड केले आहे, हे स्पष्ट दिसते. आपल्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे कदाचित अनुकरणप्रियेतून हे प्रकार जन्मास येतात, हे मान्य केले तरी, आंबेडकरी युवकांपुढेे बावीस प्रतिज्ञांचे जीवनषास्त्र बाबासाहेबांनी कोरून ठेवले आहे. तेच आपल्या साहित्याचे, कलेचे आणि जीवनाचे सौंदर्यषास्त्र आहे, हे समजून घ्यावे लागेल.

हजारो शतकांपासून गुलामी आणि लाचारीत जीवन जगत आलेल्या समाजातील युवकांना माणूस म्हणून उभे राहण्यासाठी सर्वप्रथम गरज असते एका समाजाची, समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय उन्नयनासाठी गरज असते संघटीत राजकीय शक्तीची बाबासाहेबांनी हे जाणूनच समाजाला समता सैनिक दलाच्या रूपाने बलषाली संघटना दिली. संघर्षाषिवाय काहीही प्राप्त होत नाही म्हणून या समाजाला भविष्यातही कायम संघर्ष करावा लागेल, यासाठी त्यांनी संघटना कधीही मरू देऊ नका ही ताकीद दिली. याच दलाच्या बळावर बाबासाहेबांनी अनेक लढे उभारले. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्टस् फेडरेषन ते 1956 च्या महान धम्मक्रांतीपर्यंत या दलाची यषस्वी घोडदौड आपणांस दिसते.

रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीत शोषितांच्या संपूर्ण क्रांतीची मूलतत्वे अंतर्भूत असतांना त्यांच्यानंतरच्या अपरिपक्व नेतृत्वाच्या मर्यादा आणि दूरदृष्टीच्या अभावामूळे भारतीय क्रांतीची वाताहत झाली. या देषातील जातवास्तव आणि सामाजिक, सांस्कृतिक अज्ञानाने क्रांतीचा गर्भपात झाला, हे सत्य आहे. जातींच्या उतरंडीवर उभ्या असलेल्या समाजात व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाची गळचेपी होते, ही बाबासाहेबांची तडफड आपण युवकांनी जाणून घेतली तरच स्वतंत्र मजूर पक्ष ते रिपब्लीकन पक्षापर्यंतचा आणि धम्मक्रांतीची विषालता आपल्याला कळेल.

आंबेडकरी युवकांपुढे प्रचंड मोठे आव्हान उभे आहे. धर्मसंसद आणि भांडवलषाही हातात हात घालून उभी आहे. सत्ता, शासन, प्रषासन व न्यायालयावर एकवर्णीय निरंकुष हुकूमषाही स्थापित झाली आहे. लोकषाहीच्या अस्तित्वावरच प्रष्नचिन्ह उभे झाले आहे. आपल्या चार खोल्यांच्या ताजमहालात लाडक्या मुमताजसाठी गुुलाबाच्या पाकळ्या गोळा करणाÚया बाबूवर्गीय लोकांनी, ब्राम्हणी व्यवस्थेला जोहार करीत आपल्या पोळीवर तूप ओढणाÚया लाचार महाभागांनी, बापाच्या करप्षनच्या कमाईवर गुलछर्रे उडवणाÚया बेजबाबदार मंदबुद्धी पोरांनी विकासाच्या सर्व साधनांवर कब्जा करण्यापूर्वीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी लढ्यावर जीव ओवाळून टाकण्याकरिता रणांगणावर आलेल्या आंबेडकरी युवकांनी आपल्या मुठीतला इन्कलाब जागता ठेवला पाहिजे. नाहीतर येणाÚया हजारो पिढ्या पुन्हा गुलामीच्या अंधारकोठडीत सडण्यासाठी फेकल्या जाणार आहेत. भांडवलषाहीच्या क्रूर टाचांखाली आपले अधिकार चिरडण्यापूर्वीच आपण एल्गार केला पाहिजे. पुन्हा आपल्या हक्कांचा षिरच्छेद होऊ द्यायचा नसेल, आपल्या स्वातंत्र्याचे पंख छाटले जाऊ नये असे वाटत असेल, स्वाभिमानाची हत्या होऊ द्यायची नसेल, लोकषाहीसाठी लढणाÚया क्रांतिकारकांचे शीर कलम करणाÚया धर्मांध हुकूमषाहीला रोखायचे असेल तर आंबेडकरी युवकांच्या मनगटातील पोलाद तप्त झाले पाहिजे.

कुठल्याही तकलादू राजकीय पक्षांची पखाल खांद्यावर घेण्याआधी आपण आपल्या अंतःकरणातला आंबेडकर जागा आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे. आज कुठल्याच राजकीय विचारात या देषाला स्थैर्य, शांती आणि मानवी सौहार्द देण्याची क्षमता नाही. सत्तेच्या आंधळ्या स्पर्धेत माणसांची गळेकापू स्पर्धा निकरावर आली आहे. या स्पर्धेेत आंबेडकरी समाज टिकेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून आपला नाहक शक्तिपात करण्यापेक्षा सर्वच पातळीवर समाजाचे रिकन्स्ट्रक्षन करणे हा आपल्या कार्यक्रमाचा पहिला मुद्दा असला पाहिजे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय शक्तिकेंद्र मजबूत केल्याषिवाय आपण काहीही साध्य करू शकणार नाही. तडजोडीच्या राजकारणाने या देषातील शोषितांचे भावनिक शोषण केले आहे. युवक हा या शोषणाचा पहिला बळी ठरत असतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण हे मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी प्रभावी माध्यम मानले होते. इतर साधनांपेक्षा राजकारणात लोकसहभाग अधिक आणि साधनांची उपलब्धता सहज होत असते, एवढेच. परंतू राजकीय सत्तेला स्थिरत्व प्रदान करणाÚया सामाजिक आणि सांस्कृतिक सत्तांवर आपली हुकूमत असली पाहिजे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आरएसएसचे अध्ययन करताना असे दिसते की, त्यांनी राजकीय सत्तेकडे वाटचाल करण्यापूर्वी आपली सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ता या देषाात घट्ट केली आहे. यदाकदाचित या देषावर त्यांची राजकीय सत्ता पूर्णांषाने प्रस्थापित झाली तर तिला उखडून टाकण्यासाठी आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, कारण ब्राम्हणी सत्तेची मुळे राजकारणापेक्षा सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अत्यंत खोलवर रूजलेली आहेत. आज राजकीय सत्ता त्यांच्या हातात नसली तरी राष्ट्राच्या सर्व विकास क्षेत्रात त्यांचेच अघोषित साम्राज्य आहे. आंबेडकरी युवकांनी हे वास्तव जाणून घ्यावे.

आंबेडकरी आंदोलन हा संपूर्ण शोषितांच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. हा जाहिरनामा आपल्या हातात ध्वजासारखा घेऊन कणखरपणे रणांगणावर उभे राहण्याची वेळ आलेली आहे. आपल्या नैतिकतेतून, आपल्या त्यागातून, आपल्या निष्ठेतून, आपल्या समर्पणातून, आपल्या पे्रमातून आपण अषी पोलादी फळी उभारली पाहिजे की, या देषातील तमाम शोषित भावंडांना हे आपले हक्काचे घर आहे, असा विष्वास वाटावा. आपली संघटीत युवाषक्ती आंधळ्यांना आधार, लढणाÚयांना तडपती तलवार, मुक्यांना कंठातील ललकार, दुबळ्यांना आधाराची काठी आणि अन्यायाच्या षिरावर प्रतिकाराची लाठी झाली पाहिजे. आपली निष्ठा अषी की, ‘बुद्ध और बाबासाहब को छोडना हमारे लिए प्राण त्यागने के समान है’ असावी. आपण नव्या जगाच्या निर्मितीचे शिलेदार आहोत, याचं भान सदैव आपल्या मनात असलं पाहिजे. आपली निष्ठा जगातील तमाम लढवय्यांसाठी आदर्ष ठरली पाहिजे. स्त्री-पुरूष, काळा-गोरा, उच्च-निच, गरीब-श्रीमंत या सर्व भेदांच्या पलीकडे आपली नजर गेली पाहिजे. आपलं रक्त मुक्तीसाठी लढणाÚया इतर शहिदांच्या रक्तात मिसळलं पाहिजे. आपल्या रक्तात जगातील साÚया दुःखीतांचे अश्रू मिसळले पाहिजे.

या देषाला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल, भारतीय लोकषाहीला अबाधित ठेवायचं असेल, मानवी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची सुरक्षा करावयाची असेल तर युवतींनीही हातातील कंगणं फोडून, गळ्यातील गुलामगिरीचं लोढणं तोडून पुरूषांच्या खंाद्याला खांदा लाऊन सर्वार्थाने या लढ्यात आलं पाहिजे. केवळ शोकेसमधील बाहुली, लेकरांना जन्म देणारी मषीन किंवा सभा-समारंभात सजवलेलं एखाद माॅडेल या आयडेन्टीटीतून बाहेर येऊन नव्या जगात वावरतांना शीलाचं तेज धारण करून या वर्तमानावर आपली छाप उमटवली पाहिजे. युवाविष्व स्वयंस्फूर्त झाला आहे. आपल्याला सर्वच कळतं, आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, असा एक आत्मघाती विचारही या पिढीत स्थिरावतो आहे. भौतिकतेने मानवी जगण्याचे सर्व सुंदर संदर्भ नासवून टाकले आहे, तरीही सर्व युवा पिढी निरूपयोगी आहे, असा याचा अर्थ नाही. व्यक्तीच्या भौतिक विकासावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे, तषा सुखांच्याही संकल्पना बदलल्या आहेत. अषा काळात आंबेडकरी युवक जगत आहे. भौतिकतेच्या मायाजाळात गुंतलेले प्रस्थापित बाह्यविष्व आणि त्याची आपल्याही जीवनावर आणि समाजावर पडलेली पडछाया अधिक गडद होत आहे. अषा स्थितीत मानसाची भौतिक विकासाची अभिलाषा आणि नैतिक मूल्ये यांची सांगड घालून नव्या आंबेडकरी समाजाची

केतन पिंपळापुरे,
दी पिपल, 1, नेताजी मार्केट,
सिताबर्डी, नागपूर.
8975755897

One Reply to “Another World is Possible – Reconstruction of the World”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*